संतापजनक ! अर्ध..नxग्न अवस्थेत १२ वर्षांची चिमुरडीचा मदतीसाठी टाहो, लोकं बघत राहिली

Update: 2023-09-27 13:58 GMT

२५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मध्यप्रदेशातील उज्जैन शहरात एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं माणूसकीला काळिमा फासलाय...कारण उज्जैन शहराच्या रस्त्यांवर १२ वर्षांची चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत लोकांना मदत मागत होती. मात्र, कुणीही तिच्या मदतीला आलं नाही...प्राथमिक माहितीनुसार या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले...त्या नराधमांपासून कसाबसा स्वतःचा जीव वाचवून ती चिमुरडी लोकांकडे मदत मागत होती...मात्र, कुणीही तिच्या मदतीला आलं नाही...सध्या या चिमुरडीचा रूग्णालयात जीवन-मरणाचा संघर्ष सुरूय...

महाकाल चं शहर म्हणून मध्यप्रदेशातील उज्जैन शहराची ओळख आहे...मात्र, मागील दोन दिवसांपासून हे शहर एका गंभीर घटनेनं चर्चेत आलंय...मूळची उत्तर प्रदेशातील असलेली ही १२ वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत उत्तरप्रदेशातील प्रयागराज इथून मध्यप्रदेशातील उज्जैन शहरात आली होती...२५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत उज्जैन शहरातील सांवराखेडी सिंहस्थ बायपास च्या वस्तीमधील नागरिकांना मदत मागत होती...मात्र, कुणीही तिची मदत केली नाही...अखेर पोलिसांनी तिला उज्जैन इथल्या रूग्णालयात दाखल केलं...मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळं मुलीला इंदौर इथल्या रूग्णालयात हलवण्यात आलंय... प्रचंड मानसिक धक्का बसलेली ही मुलगी बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीये...पोलिसांनी तिला जेव्हा या घटनेसंदर्भात विचारलं त्यावेळी तिनं सांगितलं की,” तिच्या आईवर देखील नराधमांनी लैंगिक अत्याचार केला आहे...”

या घटनेनंतर उज्जैन पोलिसांनी तपास पथकं तयार केली असून नराधमांसोबत पीडित मुलीच्या आईचा शोध सुरू केलाय...

Tags:    

Similar News