भारताची नाचक्की भक्त गँगमध्ये काय चाललं आहे?

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. या मुद्द्यावरुन भाजपला टीकेचा सामनाही करावा लागतो आहे. पण एरवी टीकेला आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या भक्त गँगमध्ये काय वातावरण आहे...

Update: 2022-06-06 05:47 GMT

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील एका कार्यक्रमा दरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मुस्लिम राष्ट्रांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. UAEसह काही राष्ट्रांनी आपली नाराजी भारत सरकारला कळवल्यानंतर भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई केली आहे. जिंदाल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे तर नुपूर शर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर अनेक स्तरातून भाजप आणि मोदी सरकावर टीका होते आहे. सोशल मीडियावर तर अनेकांनी आपली मतं व्यक्त करताना आता द्वेषाचा भस्मासूर भाजपवरच उलटला असल्याची टीका केली आहे. भाजपच्या कारवाईनंतर नुपूर शर्मा यांनी ट्विटवर जाहीर माफी मागितली आहे.

Full View

पण यावेळी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ खूप कमी जण पुढे आल्याचे दिसते आहे. यामध्येही समर्थन करणाऱ्यांनी आम्हाला खेद वाटतो पण आम्ही काही करु शकत नाही असे म्हणते #IStandWithNupurSharma हा हॅशटॅग ट्रेंड करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ट्विटरदेखील हा हॅशटॅग ट्रेंड होऊ शकलेला नाही. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ अनेकांनी आम्ही जास्त काही करु शकत नाही पण StandWithNupurSharma केवळ एवढेच ट्विट केले आहे.

Full View

दुसरीकडे ट्विटरवर #ShameOnBJP हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला आहे. अनेकांनी भाजपवर टीका केली आहे. पण यामध्ये काही भाजप समर्थकांनी नुपूर शर्मावर कारवाई केली म्हणून भाजपलाच घरचा आहेरही दिला आहे.

Full View
Tags:    

Similar News