पैशांची नाही; काम करणाऱ्या मानसिकतेची कमी – नितीन गडकरी

Update: 2020-01-20 04:45 GMT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाविकासआघाडीच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. राज्यांच्या तिजोरीत पैशांची कमतराता नसून राज्य सरकारमध्ये निर्णय घेण्याची धमक नसल्याचं नितीन गडकरी म्हणाले. कोणतेही काम करण्यासाठी सकारात्मक दुष्टीकोन समोर ठेवावा लागतो. विवीध योजना मार्गी न लागल्याने राज्य सरकारचा नकारात्मक दुष्टीकोन समोर येतो असंही यावेळी नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात ‘आपल्याच तोंडून आपलेच गोडवे गायले’ गेल्या ५ वर्षाच्या कालावधीत मी १७ लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत. आणि या वर्षी ५ लाख कोटी रुपयांपर्यत जाणार असल्याचं त्यांनी सांगीतले. पैशांची कमी नाही, तर काम करणाऱ्या मानसिकतेची कमी आहे. नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगीक संस्थेच्या कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

Similar News