गलवानमधील संघर्षात भारताचा एकही जवान बेपत्ता नाही

Update: 2020-06-19 03:01 GMT

लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. पण या संघर्षात भारताचे काही जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त परदेशी प्रसारमाध्यमांनी दिले होते. यावर परराष्ट्र मंत्रालयाने एकही जवान बेपत्ता झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

"चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात भारताचा एकही जवान बेपत्ता झालेला नाही" अशी माहिती लष्करातर्फे देण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे.

हे ही वाचा..

चीनने मृत सैनिकांचा आकडा का लपवला?

भारत चीन वाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे 'लाल आंखे' करून पहायची वेळ: जितेंद्र आव्हाड

भारत-चीन दरम्यान काही दिवसांपासून सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी सीमेवर सैन्य तैनात केल्याने निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी लष्करी चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. पण या दरम्यान चीनच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत चौकी उभारण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना रोखल्यानंतर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्याही ४३ जवानांना मारण्यात यश आले.

Similar News