सचिन वाझे प्रकरणी रियाजुद्दीन काजीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी आता NIAला आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत

Update: 2021-03-30 04:58 GMT

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांना NIAने अटक केल्यानंतर क्राईम ब्रांचचे आणखी एक अधिकारी रियाजुद्दीन काजी यांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. रियाजुद्दीन यांच्या चौकशीमधून आता NIA ला महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती मिळते आहे. मुंबई क्राईम ब्रान्चचे अधिकारी रियाजुद्दीन काजी यांनी देखील हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचा केल्याचे एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे.

काजी या प्रकरणा माफीचे साक्षीदार होण्यास तयार असल्याची चर्चा आहे. NIAने त्यांनी तब्बल पाच दिवस रोज सलग दहा तास चौकशी केली. या चौकशीमधून काही माहिती एनआयएला मिळाली आहे. स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचे काम सचिन वाझे आणि त्यांच्या टीमने केले होते. याच संदर्भात सचिन वाझे याचे खास असलेले मुंबई क्राइम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काजी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. यासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याकरता रियाजुद्दीन काजी मुंबईतील विक्रोळीतील कन्नमवार नगर इथल्या बंटी नावाच्या एका गॅरेजमध्ये गेले होते. त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर रियाजुद्दीन काजी त्यांनी ताब्यात घेतला. तसंच गॅरेज चालक सावंत नावाच्या व्यक्तीला देखील चौकशी करता घेऊन गेले होते, मात्र या संदर्भातील कोणतीच माहिती त्यांनी मुंबई क्राईम ब्रांचच्या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत नमूद केले नव्हती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार याच बंटी गॅरेजमध्ये सचिन वाझे यांच्या त्यांच्या टीमने गाड्यांसाठी विविध प्रकारच्या बनावट नंबर प्लेट बनवल्या होत्या. या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये याकरीता पुरावे नष्ट केले जात होते.

या दरम्यान रियाजुद्दीन काजी हे विक्रोळी कन्नमवारनगर येथील बंटी नावाच्या गॅरेजमध्ये गेले होते आणि हा प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. तो व्हीडीओ आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. यावरूनच रियाजुद्दीन काळजी यांची चौकशी देखील करण्यात आली होती, कारण 25 फेब्रुवारीला कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडली होती. त्यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान सचिन वाझे आणि त्यांच्या टीमने ठाण्यात वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर ठाण्यातील सद्गुरू कार डेकोर या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तसेच दुकानातील सर्व रेकॉर्ड आणि विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले होते, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.

Tags:    

Similar News