गुड न्युज : रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र वितरणाला परवानगी, गृहनिर्माण संस्थांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

Update: 2020-06-05 05:25 GMT

केंद्र सरकारने अनलॉक 1 (Unlock-1) ची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत देशातील नागरिकांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. राज्यसरकारने ही ‘मिशन बिगिन अगेन’ (Mission Begin Again) हे अभियान सुरु करुन नागरिकांना हळूहळू सुविधा दिल्या जात आहेत.

आजपासून एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी ३ जूनपासून राज्य सरकारने अंतर्गत प्रवासाची परवानगी दिली आहे.

त्यानंतर आता गेल्या मार्च महिन्यांपासून रेड झोन मध्ये वृत्तपत्रवितरणास असलेली बंदी सरकारने अखेर उठवली आहे. येत्या रविवार पासून तुमच्या घरात तुम्हाला पेपर वाचायला मिळेल.

येत्या रविवारपासून तुमच्या घरात सकाळी पडणार पेपर पुन्हा सुरु होणार आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत राज्यसरकारने काही अटी नुसार वृत्तपत्र वितरणास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्क लावणं बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र, शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थानी दूध वितरकांना आणि पेपर वितरकांना घरी हे सर्व साहित्य पोहोचवण्यास मज्जाव केला आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटना तसेच सर्व वैद्यकीय तज्ज्ञांनी पेपर मुळे कोरोना पसरत नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी आता या गृहनिर्माण संस्था पेपर वितरणाला परवानगी देणार का? हाच खरा प्रश्न आहे.

त्यातच ल़ॉकडाऊन (lockdown)च्या काळात वृत्तपत्र बंद झाल्यानं अनेक माध्यमांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळं अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत.

Similar News