भारत - पाक तणाव : मोदी आणि ट्रम्प यांच्यात 'फोन पे चर्चा'

Update: 2019-08-19 16:30 GMT

भारताने जम्मू काश्मीरमधील 370 आणि 35 A हे कलम हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात तणाव आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 मिनिटं फोनवर संभाषण झालं. या संभाषणा दरम्यान दहशतवादाबरोबरच दोन देशांमधील परस्पर संबंधाबाबत देखील चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी काही नेत्यांच्या हिंसक वक्तव्यामुळे आशिया खंडातील शांतता धोक्यात आल्याचे म्हटले आहे. तसंच मोदी यांनी सीमेपारहून निर्माण होणारा दहशतवाद रोखण्याची आवश्यकता असल्याचे म्हणत नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला.

Similar News