राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  रायगडमध्ये मोठा धक्का, या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश 

Update: 2019-09-04 14:45 GMT

रायगड : लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षाला गळती लागली आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेना पक्षाला पसंती देत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश केला आहे.

प्रमोद घोसाळकर यांचा शिवसेना प्रवेश तटकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असून घोसाळकर यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा रायगड जिल्हाध्यक्ष कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

Full View

Similar News