नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, जे जे रुग्णालयात दाखल

Update: 2022-02-25 14:33 GMT

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्याचे राजकारण तापले होते. त्यापाठोपाठ ईडीच्या कोठडीत असताना नवाब मलिक यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर पीएमएलए कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. दरम्यान नवाब मलिक यांची प्रकृती ढासळली. तसेच त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर शरसंधाण साधले. त्यामध्ये भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्याबरोबरच मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीने राज्यभरात आंदोलन छेडले होते. तर भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

विविध ठिकाणी असलेली दाऊदची बेनामी संपत्तीचा हसीना पारकर यांच्यामार्फत नवाब मलिक यांच्याशी व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून नवाब मलिक यांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे ईडीने याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर केल्याने अधिक चौकशीसाठी न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने अचानक त्यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत असले तरी त्यांना दैनंदिन औषधं घेऊ देणे, घरगुती जेवणाची मुभा आणि चौकशीवेळी वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मलिक यांनी मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने मलिक यांच्या तीनही मागण्या मान्य केल्या आहेत.

Tags:    

Similar News