वाशी इंटीग्रेटेड सोल्युशन कंपनीतर्फे विविध वस्तू प्रदर्शनाचे आयोजन

Update: 2024-04-10 10:21 GMT

नवी मुंबईतील वाशी इंटीग्रेटेड सोल्युशन कंपनीतर्फे प्रथमच विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात एकाच ठिकाणी कॉंट्रॅक्टर व जे फॅक्ट्री बनवत आहेत त्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आशिया खंडातील इंटीग्रेटेड सोल्युशन ही पहिलीच कंपनी आहे ज्यांनी एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. ग्राहकांना एकाच ठिकाणी त्यांना हव्या असणाऱ्या वस्तू या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळू शकतात. या कंपनीची एक वेबसाईट आहे ज्यावरुन ग्राहक त्यांना हवे असणारे साहित्य खरेदीसाठी कंपनीशी संपर्क करु शकतात. या सर्व वस्तूंची माहिती मिळावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान वाशी इंटीग्रेटेड सोल्युशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सोमेश डोडेजा म्हणाले की, नव्या व्यावसायिकदाराला व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्यांना संबंधित व्यवसायाचे साहित्य घेण्यासाठी बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागतो, काही वस्तू भेटतात तर काही भेटत नाहीत, पण आमच्याकडे नवा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी अगदी सहजतेने मिळणार आहे. कंपनी स्थापन करण्याचा आमचा मुख्य हेतु हाच आहे की, आमच्या ग्राहकांना योग्य दरात चांगल्या सेवा मिळाव्यात, असं यावेळी सोमेश डोडेजा म्हणाले

याशिवाय, कुठलीही फॅक्टरी उभा करण्यासाठी ज्या काही साधनसामुग्रीची आवश्यकता लागते अशा सर्व वस्तू आमच्याकडे योग्य दरात मिळतील, ज्यामध्ये तुम्ही Metal Category products, gear box, motar, electrical, solar, sefty products, berings इ. प्रकारच्या वस्तु विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईला भेट देऊन आपली माहिती संपर्कासह तिथे सादर करा, आमची टिम काही वेळात आपल्याला संपर्क करेल, असं आवाहन कंपनीचे दिग्दर्शक (Director) अमित डोडेजा यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News