नवी मुंबई फेस्टिव्हलचे दिमाखात उद्घाटन

जागतिक सांस्कृतिक फौंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबई फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते झाले.

Update: 2023-01-22 06:20 GMT

जागतिक सांस्कृतिक फाउंडेशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून दरवर्षी नवी मुंबईत फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणेच यंदाही 21 ते 29 जानेवारी या दरम्यान या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा बेलापूर येथील पार्क हॉटेलमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला.

नवी मुंबई फेस्टिव्हलमध्ये 14 राज्यातील कलाकार कला आणि संस्कृतीचे सादरीकरण करणार आहेत. तसेच यामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

या फेस्टिव्हलमध्ये विविध उपक्रम, स्पर्धा, खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. तसेच नवी मुंबईतील सिविड्समधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच हा फेस्टिव्हल जात, धर्म, पंथ या परिकडे जाऊन सर्वसमावेशक आणि कलात्मक असणार आहे, असंही आयोजकांनी यावेळी सांगितले. 

Tags:    

Similar News