लैंगिक शोषणाच्या आरोपातून गोगोईंची सुटका

Update: 2019-05-06 13:21 GMT

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक छळाच्या आरोपातून क्लीन चिट देण्यात आलीय. सर्वोच्च न्याय़ालयाच्या त्रिसदस्यीय समितीने याबाबतचा आपला निर्णय नुकताच दिला आहे. एका महिलेने गोगोई यांच्यावर केलेल्या आरोपानंतर देशभर खळबळ माजली होती. हे आपल्याविरोधात षडयंत्र असून न्यायव्यवस्थेवरील हल्ला असल्याचे मत गोगोई यांनी व्यक्त केले होते.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीस समितीने रंजन गोगोईंवर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळलं नसल्याचं स्पष्ट केल्याने रंजन गोगोई यांना क्लीन चिट मिळालीय. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि काहीही तथ्य नसलेले आहेत. याप्रकरणी वास्तवाशी संबंधित कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे रंजन गोगोई यांना क्लीन चिट देण्यात येत असल्याचे समितीने स्पष्ट केल्याने हा खरंच न्यायसंस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता का? याबाबत आता चर्चा सुरू झालीय.

Similar News