विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ?

Update: 2020-03-04 12:35 GMT

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलं होतं. आणि नाना पाटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी नेमणूक झाली. मात्र, उपाध्यक्षपदाची जबाबदारी अद्याप कुणालाही देण्यात आलेली नाही. सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी उपाध्यक्षपदाची जबाबदारी नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची नेमणूक सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार आहे. विधानसभेचं उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना या पदासाठी संधी मिळाली आहे. आणि त्यामध्ये दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांचं नाव उपाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे उपाध्यक्षपद त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे. झिरवळ हे शरद पवारांचे विश्वासू समजले जातात.

Similar News