दिशा सालियनच्या हत्येचे साक्षीदार सीबीआय पुढे हजर करणार- नारायण राणे

Update: 2022-04-23 12:43 GMT

राज्यात हनुमान चालिसा पठनावरुन सध्या वातावरण तापलं आहे.रवी राणा आणि नवनीत राणा मातोश्रीवर जाऊन पठन करणार या घोषणा केल्यापासून शिवसैनिकांकडून प्रखर विरोध करण्यात आला होता.याप्रकरणावरुन नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.त्यात नारायण राणेंनी दिशा सालियन प्रकरणात नवा गौप्यस्फोट केला आहे.

दिशा सालियनच्या प्रकरणातले साक्षीदार लवकरच सीबीआयकडे देणार असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत राणे यांनी केली.दिशा सालियनवर पार्टीनंतर अत्याचार झाला.तिच्या गाडीत कोण कोण होते.त्याच्या घरी तिच्यावर अत्याचार झाला.तिला इमारतीवरुन खाली कोणी टाकले,असा सवाल यावेळी राणे यांनी केले.

मागील महिन्यात दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे अडचणीत आले होते.दिशा सालियनच्या कुटुंबियांनी मुलीची बदनामी राणे कुटुंबीय करत असल्याने तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते.त्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.आता पुन्हा याप्रकरणावरुन राजकारण तापणारं असं दिसतयं

Tags:    

Similar News