नागपूरचा २ लाख टन संत्रा जातो कुठे ?

Update: 2022-12-29 11:18 GMT

विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये ,विदर्भाच्या समस्यांवर उपाय शोधून विदर्भाचा विकास व्हावा यासाठी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते .उद्योगवाढीला चालना येण्यासाठी अनेक धोरणे विदर्भासाठी ठरवली जातात पण अमलबजावणी होत नाही .

नागपूरमध्ये सर्वात जास्त संत्र्याचे उत्पादन आहे .त्यामुळेच नागपूरला संत्रा नगरी म्हंटले जाते .यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला ,"नागपूरला संत्रानगरी म्हणवणाऱ्या संत्रा उत्पादकांसाठी संत्र्याची प्रक्रिया करणारे किती प्रकल्प उभारले गेले? असा प्रश्न सरकारला दानवे यांनी विचारला.

जरी नागपुरात संत्री पिकत असले तरी प्रक्रियेअभावी येथील संत्री उत्पादक हे बांगलादेशला २ लाख टन

संत्री पाठवितात. मात्र आयात शुल्क वाढवल्याने व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संत्रा उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. आणि त्यामुळेच एकप्रकारे संत्रा उत्पादकांवर अन्याय होत असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.सर्वांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारकडे आयात शुल्कासंबंधीत पाठपुरावा केला पाहिजे. तसेच वाहतूक व पॅकेजिंगसाठीच अनुदान सरकारने या उत्पादकांना द्यावे अशी सूचना अंबादास दानवे यांनी फलोत्पादन मंत्र्यांना केली आहे.सोबतच रेशीम उद्योगालाही चालना देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

Tags:    

Similar News