Monsoon Alert! ठाणे जिल्ह्यात पावसाच्या सरी; कोकणात 7 जूनपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज

Update: 2023-05-26 03:56 GMT

ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मे महिण्यातील प्रचंड उकाड्याने ठाणेकर हैराण झाले होते. त्यामुळे काही काळासाठी या सरींनी परिसरात गारवा निर्माण केला. त्यामुळे काही अंशी ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. तसंच कामावर जाणाऱ्या ठाणेकरांची तारांबळ उडाली आहे.

मे महिन्यात सकाळी सकाळी ठाणेकरांना छत्री घेऊन ऑफिस गाठावं लागलं. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्राची सुरवात झाल्याने 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहोचण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्राकडे बाष्पयुक्त वा-यांचा प्रवास सुरू होताच मान्सूनचा महाराष्ट्राकडे येण्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे केरळ राज्यात 4 ऐवजी 1 जून रोजीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसंच महाराष्ट्रात तळकोकणात 7 जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 27 मे पासून कोकणात हलका ते मध्यम पावसाचा इशारा पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे.

Tags:    

Similar News