कुरुंद येथील मोफत लसीकरण अभियानास खासदार सुजय विखे यांनी दिली भेट

पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे सर्वात मोठ्या मोफत लसीकरण अभियानास अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी भेट देऊन गाव तिथे लसीकरण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Update: 2021-08-22 09:28 GMT

पारनेर तालुक्यातील कुरुंद येथे सर्वात मोठ्या मोफत लसीकरण अभियानास अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी भेट देऊन गाव तिथे लसीकरण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी खासदार विखे यांनी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानास भेट देऊन स्वस्त धान्य दुकानदारास वाटपासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या.

यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच राष्ट्रीय महामार्ग विकास योजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७६१ राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामांचे भूमिपूजन खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी केले.

यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया ताई झावरे,पंचायत समिती सभापती गणेश शिंदे,जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे राहुल शिंदे,निघोजचे सरपंच सचिन वराळ,भाजपचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे,विश्वनाथ कोरडे,सरपंच गणेश मधे ,राळेगणचे सरपंच पंकज कारखीले,गव्हाणवाडीचे सरपंच संदीप गायकवाड हे उपस्थित होते.

Tags:    

Similar News