योगी विरुद्ध मोदी वाद अपयश झाकण्यासाठी: नवाब मलिक

Update: 2021-06-11 05:53 GMT

काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत. परंतू कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल. अशी एक पण योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला. असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

उत्तरप्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे. असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Tags:    

Similar News