गुजरात आणि महाराष्ट्राच्या विरोधामुळे मोदी सरकारचा एक प्रकल्प रद्द?

मोदी सरकारच्या अनेक निर्णयांना बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यांमध्ये विरोध होतो, असा आरोप सत्ताधारी करत असतात. पण आता पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गुजरात राज्यानेही एका निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे मोदी सरकारने एक प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

Update: 2022-03-29 05:13 GMT

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या वक्तव्याचा हवाला या वृत्तामध्ये देण्यात आला आहे. यानुसार पार-तापी-नर्मदा(PTN) या नदीजोड प्रकल्पाला महाराष्ट्र आणि गुजरात सरकारने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची माहिती सीआर पाटील यांनी दिली आहे. सीआर पाटील यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोमवारी भेट घेतली. तसेच या भेटीमध्ये अमित शाह यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती सीआर पाटील यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे. या प्रकल्पामुळे या भागातील आदिवासींवर दुष्परिणाम होणार आहेत, अशी भूमिका आपण मांडल्याचे सीआर पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान काँग्रेसनेही या नदीजोड प्रकल्पाला विरोध केला आहे. काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीला केंद्रीय़ अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे देखील उपस्थित होते. तसेच या तिन्ही मंत्र्य़ांनी हा प्रकल्प रद्द करण्यास मान्यता दिल्याचे सीआर पाटील यांनी सांगितले.

Tags:    

Similar News