'बाई जरा दमानं घ्या', अमृता फडणवीस यांना कोणी दिला असा सल्ला?

Update: 2019-12-25 15:41 GMT

गेल्या काही दिवसांपासुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना दिसत आहेत.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी ‘वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही’ असं ट्विट केलं होत. सोशल मिडीयावर त्यांच्या या वक्तव्याचा नेटीझन्सनी चांगलाच समाचार घेतलाय. मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनीही अमृता फडणवीस यांना अशा प्रकारची वक्तव्य करुन राजकीय वाद का निर्माण करायचा असा सवाल केला आहे.

“ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेचं होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे? पाच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणुन आपण काहीच योगदान दिलं नाही. समुद्रात फिरायला जाणं, गाणी गाणं अशी काम आपण केली. म्हणुन बाई थोडं दमानं घ्या” असा सल्ला रुपाली ठोंबरे-पाटील यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1045265772500304/?t=1

Similar News