"कोण आला रे कोण आला, मुख्यमंत्र्यांच न ऐकणारा मंत्री आला"

Update: 2021-09-03 07:06 GMT

देशात कोरोनाच्या आकडे वाढत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी एका दिवसात तब्बल 12 टक्क्यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र असे असतानाही राज्यातील मंत्री आणि सत्तधारी पक्षातील नेते गंभीर होताना दिसत नाही. ठाकरे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्याचे गर्दीचे कार्यक्रम धुमधडाक्यात सुरु असल्याने यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्वीट करत खोचक टोलाही लगावला आहे. संदीप यांनी गर्दीचा व्हिडिओ पोस्ट करताना लिहलं आहे की, "कोण आला रे कोण आला मुख्यमंत्र्यांच न ऐकणारा मंत्री आला. स्थळ-माहीम 2 सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता. आता मंत्री महोदय, महापौर, वॉर्ड ऑफिसर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का??" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.





    गेल्या आठवड्यात पैठणमध्ये पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थित भव्य प्रवेश सोहळा पार पडला यावेळी हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळाली होती. त्यात आता उद्या ( 4 सप्टेंबर ) रोजी जुन्नर येथे शिवसेनेकडून मेळावा आयोजित करण्यात आला असून,शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे "लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण" अशी अवस्था शिवसेनेची झालेली पाहायला मिळत आहे.
Tags:    

Similar News