मनसेची बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम

Update: 2020-02-22 08:16 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी 'बांगलादेशी हटाव' अशी हाक दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पुण्यात शनिवारी सकाळी मनसैनिकांनी सातारा रस्त्याजवळ धनकवडी इथं राहत असलेल्या संशयित बांगलादेशी नागरिकांना शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली तसंच पोलिसांसोबत तिथं जाऊन काही नागरिकांना त्यांच्या ताब्यात दिले. या ठिकाणी सात-आठ बांगलादेशी कुटुंब राहत होते असा दावा मनसेनं केला आहे. पण त्यातील ५ ते ६ घऱातील लोकांनी घऱांना कुलूप लावून पोबारा केल्याचा दावाही मनसेनं केला आहे.

तर ३ जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या लोकांकडे आधारकार्ड किंवा पॅनकार्ड अशी ओळखपत्र सापडली असली तरी ती बनावट असल्याचा संशयसुद्धा मनसेनं व्यक्त केला आहे. आता पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

Full View

Similar News