आमदार गेले म्हणुन पक्ष संपत नाही: उद्धव ठाकरे आक्रमक

Update: 2022-07-08 09:21 GMT

शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणीही घेऊ शकत नाही. शिवसेना कुणाची...काही कुणी चोरून घेऊ शकत नाही...विधिमंडळ पक्ष आणि रस्त्यावरील पक्ष फरक आहे..कितीही आमदार गेले तरी पक्ष जात नसतो....लोकांच्या मनात भ्रम तयार केला जात आहे. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज पत्रकार परीषदेत आक्रमक झाले.

विधिमंडळ पक्ष आणि रजिस्टर पक्ष फरक आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचेच राहील..जे 16 आमदार सोबत राहिले...त्यांना वाट्टेल त्या धमक्या आल्या... पण तरीही ते सत्यमेव जयते म्हणत सोबत राहिले, असे उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

11 जुलै रोजी होणारी सुनावणी हि देशात लोकशाहीच अस्तित्व कितीकाळ टिकणार आहे....राज्य घटना नुसार कारभार होणार आहे कि नाही असा दिशा देणारा निकाल असेल....कारण माझा न्याय देवतेवर विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले.

बंडखोरांना आवाहन करत ठाकरे म्हणाले, देशात लोकशाहीच भविष्य किती शिल्लक आहे हे स्पष्ट होईल.आज अनेकजण म्हणतात कि आजही बोलावलं तर यायला तयार.मी आधीच बोललो होतो...सुरत ला जाऊन बोलायची गरज नव्हती.आजही तुम्हाला मातोश्री बदल प्रेम आहे हे दिसत त्याबद्दल धन्यवाद

असल्याचे त्यांनी सांगितले. पण गेली अडीच वर्ष हीच लोक माझ्या कुटुंबीयांविषयी विकृत भाषा वापरात होते त्यांना विरोध करणारे कुणी काही बोलले नाही... ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे.माझ्या मुलाला आयुष्यातून उठविण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचे स्वागत तुम्ही स्विकारत आहे....

एकाच प्रश्नच उत्तर जनता मागत आहे....इतके पद देऊनही असे का वागले..सर्व सामान्य माणसांचे मनापासून धन्यवाद.त्यांना असे खेळ आवडत नाही... विधान सभेची निवडणूक घ्या.जर आम्ही चुकलो असेल तर लोक आम्हाला निवडून नाही देणार.जी गोष्ट सन्मानाने होणार  होती ती असा घातपात घडवून का केली...सन्मानाने बोलवावे हे आता सुचत....अडीच वर्ष कुठे गेले होते, असाही सवाल उध्दव ठाकरेंनी उपस्थित केला.

Full View

Tags:    

Similar News