शिवसेनेला धक्का, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा, वंचित मध्ये जाणार?

Update: 2019-10-03 08:44 GMT

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून बुलढान्यातील माजी आमदार विजयराज शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेला रामराम करत शिंदे हे वंचितमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विजयराज शिंदे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने विजयराज शिंदे नाराज होते. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले असून संजय गायकवाड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे बुलढाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे.

विजयराज शिंदे 4 ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः माध्यमांना दिली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिंदे हे वंचितच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते वंचितमध्ये जातील असंही बोललं जात आहे.

Full View

Similar News