काही लोकांना माझ्यावर टीका केल्याने टीआरपी मिळतो; आमदार निलेश लंके यांचे खासदार सुजय विखे यांना प्रत्युत्तर

Update: 2021-12-07 12:10 GMT

अहमदनगर// स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकिय चिखफेक सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान याच मुद्द्यांवरून अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. विखे पाटील कर्जत येथे बोलताना आमदार निलेश लंके यांच्यावर उपहासात्मकपणे टीका करताना म्हटले की, जिल्ह्यात दोन नाही तर सहा मंत्रीपदे देऊन अहमदनगर जिल्ह्याला राज्याची राजधानी घोषित करावी. गरज पडली तर नगरमध्ये एखादे मंत्रालय देखील बांधता येईल, असा खोचक टोला विखे यांनी लगावला होता.

याबाबत बोलताना पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी खासदार विखे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे, काही लोकांना माझ्यावर टीका करून टीआरपी मिळवायचा असतो त्यातीलच हा प्रकार आहे. मी त्यांच्या टीकेला एवढं महत्व देत नाही. ज्यांचा राज्यात काडीचा संबंध नाही त्यांना याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. राज्यात काय निर्णय घ्यायचा ते आमचे पक्ष श्रेष्ठी ठरवतील असं आमदार लंके यांनी म्हटले आहे.

पारनेर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी आज आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यावेळी आमदार लंके पत्रकारांशी बोलत होते.

Tags:    

Similar News