'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी!' जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Update: 2020-05-21 01:07 GMT

महाराष्ट्र भाजपकडून २२ मे रोजी राज्य सरकारविरोधात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातलं राजकारण तापत असल्याचं दिसतंय.

आंदोलन यशस्वी होण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यासाठी कृती कार्यक्रम आणि सूचना दिल्या आहेत. त्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. 'दो गज की दूरी, सत्ता की लालच बुरी' असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा...


Exclusive: पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी का नाकारली? पहा काय म्हणाले सुरेश धस

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत: अजित पवार भाजपवर संतापले

अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का !

चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

Similar News