पिशवीतील दूध 2 रुपयांनी महागणार?

Update: 2019-12-12 15:55 GMT

सहकारी संघाकडून पिशवीमार्फत वितरीत केलं जाणारं दूध प्रतिलिटर 2 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. राज्याच्या कल्याणकारी दूध(milk) संघाची येत्या शनिवारी बैठक होत आहे. त्यामध्ये या दरवाढीची घोषणा होऊ शकते. राज्य कल्याणकारी दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के यांनी ही माहिती मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना दिली आहे.

ही दरवाढ टाळायची असेल तर सरकारने आम्हाला लिटरमागे 5 रुपयाचे अनुदान द्यावं. अशी मागणी देखील त्यांनी केलीय. राज्यात सध्या विविध दूध संघामार्फत दररोज 2 कोटी दूधाचं कलेक्शन होत असून त्यापैकी 90 लाख लिटर दूध हे पाऊच अर्थात पिशवीमार्फत वितरीत केलं जातं.

Full View

पण सध्या सरकारकडून फक्त दूध पावडरवर च अनुदान (सबसिडी) मिळत असल्यानं पिशवीतलं दूध विक्री करताना दूध संघाना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. म्हणूनच सरकारने पिशवीच्या दुधावर सबसिडी द्यावी अन्यथा प्रतिलिटर 2 रुपयांची दरवाढ अटळ असल्याचं बाळासाहेब म्हस्के यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

Similar News