#MaxMaharashtra Impact – संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Update: 2021-03-04 12:56 GMT

मॅक्स महाराष्ट्रच्या आणखी एका बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी दबाव वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा दिला होता. पण हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात न आल्याने संजय राठोड हे तांत्रिकदृष्ट्या मंत्रीपदी असल्याची बातमी सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्रने दिली होती. त्यानंतर दोनच दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.

संजय राठोड यांनी विधिमंडल अधिवेशनाच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला होता. पण त्यांनी तो राज्यपालांकडे पाठवला नव्हता. मॅक्स महाराष्ट्रने राजभवनात यासंदर्भात संपर्क साधला तेव्हा तिथल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप आला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर संजय राठोडांचा राजीनामा केवळ अधिवेशनातील फ्लोअर मॅनेजमेंटसाठी घेतला गेला होता का असा सवाल मॅक्स महाराष्ट्रने उपस्थित केला होता.

Tags:    

Similar News