भीषण स्फोटात मसूद अजहर जखमी

Update: 2019-06-24 07:17 GMT

जैश ए मोहमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानमधील रावळपिंडी मिलिट्री हॉस्पिटलजवळ झालेल्या भीषण स्फोटात जखमी झाला आहे. या हल्ल्यात आणखी १० जण जखमी झाल्याचं वृत्त ट्विटरच्या हवाल्याने देण्यात आले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधीनींना घटनस्थळी वार्तांकन करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

क्वेटा येथील मानव अधिकार कार्यकर्ते एहसान उला मियाखली यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्राने काळ्या यादीत टाकलेला जैश ए मोहमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहर हा रावळपिंडी मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं मियाखली यांनी म्हटलं आहे.

Similar News