Mumbai High Court : सुनेला घरकाम सांगणे म्हणजे क्रुरपणा? मुंबई उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

विवाहीत महिलेला घरकाम सांगणे म्हणजे छळ (Cruelty) असल्याचा आरोप करत एका महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे.

Update: 2022-10-28 03:55 GMT

विवाहित महिलेला घरकाम सांगणे म्हणजे तिला मोलकरणीसारखी (maid) वागणूक दिली जात आहे, अशी तक्रार एका महिलेने केली होती. या तक्रारीची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai high Court) औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) घेत सुनावणी घेतली. मात्र यानंतर न्यायालयाने महिलेचा अर्ज फेटाळून लावला. यावेळी विवाहित महिलेला (Married woman) घरकाम करायला सांगितले जात असेल तर त्याचा अर्थ तिला मोलकरणीसारखे वागवले जाते, असा होत नाही. तसेच न्यायालयाने पुढे म्हटले की, कोणत्याही महिलेला लग्नानंतर घरकाम करायचे नसेल तर त्या महिलेने लग्नापुर्वी सांगायला हवे. ज्यामुळे मुलाला विचार करणे सोपे होऊ शकते. तसेच लग्नानंतर अशा प्रकारे समस्या निर्माण झाली तर त्यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. (Bombay high court decesion on married woman household work is not cruelty case)

प्रकरण नेमके काय आहे? (What is case)

एका महिलेने केवळ तिचा छळ झाल्याचे सांगत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पती आणि सासूविरोधात घरगुती हिंसाचार आणि क्रुरतेचा आरोप केला होता. त्यावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमुर्ती राजेश पाटील यांनी आदेश देत महिलेने 21 ऑक्टोबर रोजी केलेली FIR रद्द करण्यास सांगितले.

न्यायालयाने काय म्हटले?

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महिलेने छळ झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र यामध्ये कोणत्या प्रकारचा छळ यासंदर्भात माहिती नमूद केली नव्हती. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम 498 A नुसार केवळ मानसिक आणि अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही माहिती अपुरी असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच घरकाम करण्यास सांगितले म्हणजे मोलकरणीसारखी वागणूक असा त्याचा अर्थ होत नसल्याचे न्यायालय म्हणाले. 

Tags:    

Similar News