मराठा आरक्षणातील तीन योद्धे

Update: 2024-01-25 03:15 GMT

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हात ज्वलंत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावत मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर चा अल्टीमेटम दिला होता, या अल्टीमेटम नंतर एक दिवस आधी बीडमध्ये सभा घेत 20 जानेवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती, त्याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने कूच करत आहे.



अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर बीडच्या गेवराई मधून अहमदनगर पुणे मार्गे मोर्चा आज नवी मुंबईत धडकणार आहे. उन्हातानाची परवा न करता, गुरं - वासर गावकऱ्यांच्या भरवशावर सोडून समाज पायी मोर्चामध्ये सामील होत मुंबईच्या दिशेने चालत आहे. जसजसा मोर्चा पुढे जात आहे तस तशी पायी चालणाऱ्यांची संख्या ही वाढत आहे. महाराष्ट्राने क्वचितच कधी पाहिला असेल येवढा जनसमुदाय, एवढे भव्य आंदोलन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उभे केले आहे.




 

आता नाही तर.... कधीच नाही!

आता नाही तर.... कधीच नाही! अशा आशयाचे पोस्टर जागोजागी लागल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामधे मनोज जरांगे यांच्या बरोबर शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायक मेटे पाहाला मिळत आहेत.





 


यांच्या कार्यामुळेच समाज एकवटला आहे

मनोज जरांगे यांच्या पाठीशी एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज उभा राहिलाय याचं श्रेय मनोज जरांगे यांच्या बरोबरच मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरुवात करणारे कै. अण्णासाहेब पाटील आणि विधिमंडळात आणि रस्त्यावर उतरून मराठ्यांच्या प्रश्नासाठी - आरक्षणासाठी आंदोलन करणारे कै. विनायक मेटे यांनाही तेवढच जातं.




कोण होते अण्णासाहेब पाटील ?

अण्णासाहेब पाटील यांचा जन्म 25 सप्टेंबर 1933 ला पाटण तालुक्यातील मंगरुळे गावात झाला. अण्णासाहेब पाटील हे कामगार व माथाडी नेते म्हणून त्याकाळात ओळखले जात.

80 च्या दशकात मराठा समाजाचे कोणत्याही प्रकारचे व्यापक संघटन नव्हते छोटे छोटे मंडळ आपआपल्या भागात समाजाचे काम करायचे राज्यस्तरीय कोणतीही संघटना प्रभावी नव्हती.

अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याची सुरवात १९८० पासून केली.

अण्णासाहेब पाटील यांना माथाडीची हालाखाची स्थिती माहिती होती. एकूणच सर्व मराठा समाजाची स्थिती अत्यंत नाजूक होती. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी जाणून घेतले.

छोट्या छोट्या मंडळ आणि संघटनेला एकत्र करून त्यांनी मराठा महासंघाची स्थापना केली

महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाकरिता त्यांनी झंझावाती दौरे काढले.




मराठा आरक्षणासाठी आग्रही नेता

मराठा आरक्षणासाठी आग्रही नेता, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आरक्षणासाठी सातत्यानं आवाज उठवणारे आणि त्यासाठी निकरानं लढा देणारे नेते, अशी विनायक मेटे यांची ओळख होती.

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्यांचं 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झालं.




विनायक मेटेंच्या निधनानंतर बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं होत

समाजाला न्याय मिळावा, ही मेटे यांना खरी श्रद्धांजली असेल."



Tags:    

Similar News