मराठा क्रांती मोर्चाचे उद्या मुंबईत निषेध आंदोलन

Update: 2023-09-02 15:33 GMT

जालना जिल्ह्यात शुक्रवारी पोलिसांकडून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. या आंदोलना दरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. यावर राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे. उद्या मुंबईतही निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत दादर प्लाझा येथे सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. याबाबत पार पडलेल्या बैठकीत मराठ्यांना गृहित धरत सरकारने गंडवल्याचा रोष दिसून आला. या बैठकीत, मराठा समाजाचं नेतृत्व निवडण्यावर भर देण्याचं ठरल असून आता मराठा समाज "अनाजी पंतां"ची पाठ सोडणार नाही, यावर एकमत झाल्याचं सांगण्यात येत. तसेच मराठा समाजाच्या बैठकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

मराठा समाजाकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच मराठा समाजात नावारूपाला आलेले नेते विकले गेले असून काहींनी विविध पक्ष निवडून प्रवक्ते झाल्याची बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली.

Tags:    

Similar News