मनोज जरांगे पाटील पुन्हा बसणार बेमुदत उपोषणाला

Update: 2024-02-05 08:32 GMT

राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा संघर्ष सातत्याने सुरू आहे माञ अद्याप तो लढा पूर्ण झाला नाही. काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे हे आपल्या लाखो मराठा बांधवांचा ताफा घेऊन राजधानीत आले होते, २७ जानेवारीला ते वाशीमध्ये पोहचताच राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत आध्यादेश काढण्यात आला होता. त्याचबरोबर इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असं मुख्यमंञी एकनाथ शिंदे म्हणाले होते. यामूळे मराठा समाजामध्ये आरक्षण मिळणार या खाञीने आनंदोत्सव सुध्दा साजरा करण्यात आला. माञ सध्या सोशल मिडीयावरून जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा काय फायदा झाला ? असा सवाल काही वापरकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे, यावर जरांगे यांनी प्रतिउत्तर देत म्हटलं आहे की, सोशल मीडियावर बोलणाऱ्या काही लोकांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील काही नेत्यांकडून माझ्याविरोधात बोलण्याची सुपारी घेतली आहे.

हा लढा मराठा समाजासाठी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातले लोक जाणून-बुजून बोलतायत. जर ते इथून पुढे गप्प बसले नाहीत, तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह नावं जाहीर करेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

पुन्हा एकदा मी आगामी १० तारखेला या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण करणार आहे. जोपर्यंत या आध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होत नाही आणि कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार. मी कुठेही बसलो, तरी मराठा आरक्षणावरच बोलतो. मला चार भिंतीत दुसरं काही करायचं असतं, तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो. लोकांमध्ये कशाला आलो असतो?” असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Tags:    

Similar News