Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतला मोठा निर्णय, अंतरवाली सराटीला रवाना; सर्वांना घरी जाण्याचं आवाहन

Update: 2024-02-26 04:43 GMT

भांबेरी : सगे सोयरे अध्यादेशासाठी अंमलबजावणी करिता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, मराठा बांधवांनी त्यांना मुंबईला जाऊ नये अशी विनंती केली. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बसही पेटवून देण्यात आली आहे. त्यानंतर अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यानं जरांगे पाटील यांनी लगेचच मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतला. संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. तोपर्यंत मराठा बांधवांनी घरी जावं असं देखील आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. जरांगे पाटील म्हणाले की,“मी संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो. मराठा बांधवांनी आपआपल्या घरी जावं. मी अंतरवाली सराटीत जाऊन उपचार घेईन. सगळ्यांनी शांततेत आपआपल्या गावी जावं.” मनोज जरांगे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईला जाणे टाळले. पुन्हा अंतरवाली सराटीकडे फिरले. कायद्याचा आणि पोलिसांचा सन्मान म्हणून एक पाऊल मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच देवेंद्र फडणवीस घाबरले आणि त्यांनी संचारबंदी लावल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून केला जात आहे.  

Tags:    

Similar News