मालेगावात महापालिका आयुक्तांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या 590

Update: 2020-05-14 03:31 GMT

उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा मोठ्या प्रमाणाता प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालगेवामध्ये तर आता महापालिका आयुक्तांनाच कोरोनाची लागण झाली आहे. तर एकट्या मालेगावातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 590 झाली आहे. मालेगावमधील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत आढावा बैठक सुरू असतांनाच महापालिका आयुक्तांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच ते बैठकीतून बाहेर निघून गेले. यावेळी आरोग्य मंत्र्यांसह, कृषीमंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय अधिकारी होते बैठकीत. या बैठकीत उपस्थित असलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात बुधवारी आणखी अकरा कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या 210 जाली आहे. त्यामुळे 17 मेपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये 8 व्यक्ती भुसावळ इथल्या तर दोन व्यक्ती या जळगाव शहरातील आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असून आता 62 झाली आहे.

Similar News