माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात

Update: 2020-02-24 03:46 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. मात्र, मतमोजणी पुर्वीच मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना पाच संशयितांना पकडले आहे. हे पाच लोक काल मतदान अधिकारी म्हणून काम करत होते. ते झोपायला मतमोजणी केंद्रावर होते. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही नाही. स्वत:ला निवडणूक अधिकारी म्हणणाऱ्या या पाच व्यक्तीकडे खोट ओळखपत्र सापडल्यानं माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

हे ही वाचा :माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक : अजित पवार पराभवाचा वचपा काढणार का?

विशेष बाब म्हणजे पवार कुटुंबियाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या साखर कारखान्याचे सभासद आहेत. सध्या या कारखान्यावर भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे गटाची सत्ता आहे. त्यामुळं महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या पवारांच्या बारामतीत अशी ओळख असलेल्या बारामतीत भाजपची सत्ता असल्यानं पवार कुटुंबाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

Similar News