'फडणवीसजी आज ही सरकार पाडण्याची वेळ नाही': जयंत पाटील

Update: 2020-05-27 12:52 GMT

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना आज रोखठोक उत्तर दिले आहे. काल (मंगळवार) देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राने राज्यसरकारला हजारो कोटी रुपयांची मदत केल्याचे आकडे सांगितले होते. तसंच राज्यसरकार कोरोना ची परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलं असल्याची टीका देखील केली होती. त्यानंतर आज कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आकडे खोटे असल्याचा दावा केला आहे.

'राज्य सरकार सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाशी लढत आहे. अशावेळी माझं देवेंद्र फडणवीस यांना एकच सांगणं आहे की, ही काही सरकार पाडण्याची वेळ नाही. ही वेळ सरकारच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची वेळ आहे.'अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली.

काय म्हणाले अनिल परब?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अभासी पत्रकार परिषद घेतली. त्याला आम्ही उत्तर देतोय. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर गोष्टी ठेवून असं चित्र उभं केले की केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून मी सत्य परिस्थिती समोर मांडतोय.

गरीब कल्याण योजने अंतर्गंत आम्ही मदत केली? हा देशाचा निर्णय आहे या निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला झाला.

१७५० कोटींचा गहू मिळाला नाही. मजूरांचे पैसै मिळाले नाही. पंतप्रधान किसान योजनेत आम्ही पैसै दिले असं फडणवीस सांगत आहेत. मात्र, हे आधीपासूनच सुरु आहे. ११६ कोटी केद्रांने दिले पण १२१० कोटी महाराष्ट्र देते. हे सांगायला ते विसरले. देशाला जो महसूल जातो त्यातील 35% महसूल महाराष्ट्रातून जातो. राज्यात मजूर जास्त त्यांची काळजी महाराष्ट्राने घेतली.

मजुरांना पाठवण्यासाठी 100 कोटींची व्यवस्था केली

बसेसने पण व्यवस्था केली

कोरोना संकट कमी झालं असं झालं नाही

मुंबईची स्थिती काळजीची आहे

कोणाची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेत आहोत

विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा आहे

पण त्यांनी मोहीम उघडली आहे सरकारला बदनाम करण्याची,सरकारला अस्थिर करण्याची कालच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे काही निवेदन केले त्याबाबत जनतेला वस्तुस्थिती काय आहे हे सांगायला आलो आहोत.

Similar News