कंटेनमेंट झोनचे निकष बदलणार? राज्याने केंद्र सरकारला दिला प्रस्ताव

Update: 2020-06-12 02:30 GMT

केंद्र शासनाने कंटेनमेंट झोनसाठी जे निकष केले आहेत त्यात बदल करण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये शेवटचा रुग्ण आढळल्यानंतर २८ दिवस त्या भागातील व्यवहार बंद ठेवले जातात. हा बंद काटेकोरपणे पाळला जावा यासाठी पोलिस तैनात केले जातात. त्यामुळे राज्यातील पोलिस मोठ्या संख्येने अशा कंटेनमेंट झोनच्या ड्युटीवर आहेत.

त्यांना आराम मिळावा आणि पोलिसांचा अन्यत्र वापर व्हावा यासाठी २८ दिवसांच्या निकषाऐवजी १४ दिवस कंटेनमेंट झोनमध्ये व्यवहार बंद ठेवण्याबाबत विचार व्हावा आणि त्यावर केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना पाठवण्यात याव्या, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

Similar News