डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : विक्रम भावेचा जामीनअर्ज फेटाळला

Update: 2020-01-21 11:46 GMT

डॉ. नरेंद्र दाभोलकर (dr.narendra dabholkar) हत्याप्रकरणातील आरोपी विक्रम भावे (vikram bhaves) जामीनअर्ज याचा पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. आज याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. विक्रम भावेवर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येआधी रेकी केल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. विक्रम भावे आणि एड.

संजीव पुनाळेकर यांना काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. विक्रम भावे याने दाभोलकर यांची आरोपींना ओळख पटवून देण्याचा आणि रेकी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विक्रम भावे हा गडकरी रंगायतन स्फोटप्रकरणातील आरोप आहे.

 

 

Similar News