मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पार्ल्यात गणपतीचे दर्शन

Update: 2019-09-07 12:00 GMT

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले व मनोभावे पूजन केले. ऐतिहासिक मूल्य असलेल्या शतक महोत्सवी गणेशोत्सवा निमित्त लोकमान्य सेवा संघाचे तसेच विले पारल्याच्या सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत राज्यपाल भगतसिंग कोशियारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परफेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील,मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

याप्रसंगी गणरायाच्या दर्शना सोबत त्यांनी लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

तसेच थोर साहित्यिक पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लोकमान्य सेवा संघातील पु.ल.गौरव कला दालनात पु.ल.च्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी " या दालनात आलेली मंडळी दिवसातून किती तास हसतात ? "असे विचारत, " पु.ल.देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा " असे उदगार काढत पु.ल.देशपांडेंच्या गुणवैशिष्ट्याचा गौरव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रसंगी विले पार्ल्याच्या इतिहासाचे दोनही खंड संस्थे मार्फत तर आमदार पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणी लिखित तसेच ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर लिखित पुस्तकेही देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे,कार्याध्यक्ष उदय तारडाळकर, उद्योजक दीपक घैसास, आमदार पराग अळवणी तसेच पार्ल्यातिल सर्व नगरसिविका सुनीता मेहता व ज्योती अळवणी,नगरसेवक अनिष मकवनी, अभिजित सामंत,मुरजी पटेल व मान्यवर उपस्थित होते.

Similar News