महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला, बस सेवा ठप्प!

Update: 2019-12-29 05:57 GMT

महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्र सह कर्नाटकात उमटायला लागले आहेत. ‘महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला’, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते.

या वक्तव्यानंतर दोनही राज्यातील सीमाभागातील जनता संतप्त झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून दोनही राज्यातील बससेवा थांबवण्यात आली आहे. त्यामुळे दोनही राज्यातील प्रवाशी अडकले असून जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत बससेवा सुरु करण्यात येणार नाही.

हे ही वाचा...

‘प्रकाश आंबेडकर मनुवाद्यांचा अजेंडा लोकांसमोर आणत आहेत’

गुलजार म्हणतात… ‘दिल्ली वालों’ से सावधान, पता नहीं वे कौन सा कानून ले आएं’

आपण पाकिस्तान होत चाललो आहोत : भालचंद्र नेमाडे

त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच कर्नाटकात कन्नड वेदिका संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी , वातावरण तापू लागल्याने दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली आहे. कोल्हापूर, कागल, निपाणी,बेळगाव या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील प्रवासी अडकले आहेत.

तर दुसरीकडे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी ‘कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसे, याचे उदाहरण घालून देऊ’ असा सज्जड दम भरत राजेश पाटील यांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळं वातावरण आणखीनच चिघळलं आहे. दोनही राज्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जात आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात कर्नाटक राज्याची कन्नड वेदीक संघटना असा संघर्ष पेटला असताना आज बेळगाव येथे चंदगड चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याचे आयोजन आहे. आज तीन वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर कन्नड वेदिका संघटनेने या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

Similar News