मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता

Update: 2020-05-23 02:15 GMT

कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असल्याने सावधानता बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरु होऊ शकते का याची चाचपणी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना दिले आहेत. शुक्रवारी इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली.

यावेळी रेड झोनमधील शहरे वगळून इतर ठिकाणी चित्रीकरणाबाबत प्लान दिल्यास सरकारचा त्याचा विचार करेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला फाऊंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे डी मजिठीया, नितीन वैद्य, एकता कपूर, पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी उपस्थित होते.

मराठी निर्माते आणि कलाकारांसोबत याआधी झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे पोस्ट प्रॉडक्शनची कामे किंवा शहरांबाहेर काही प्रमाणात चित्रीकरणाला परवानगी देता येईल का याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनने सध्याच्या परिस्थितीत चित्रिकरणाबाबत काय करू शकतो याचा आराखडा दिल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Similar News