अभ्यासक्रमात कपात, नेमका निर्णय़ काय?

Update: 2020-07-26 02:19 GMT

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्षामध्ये नेहमीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासक्रमात २५% कपात करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

एकूण किती विषयांचा अभ्यासक्रम झाला कमी?

बालभारती आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयांचे सर्व अभ्यासक्रम २०२०-२१ साठी प्राथमिक स्तरावर २२, माध्यमिक स्तरावर २० आणि उच्च माध्यमिक स्तरावर ५९ असे एकूण १०१ विषयांचे इयत्ता निहाय, विषय निहाय २५% अभ्यासक्रम कमी करण्यात आले आहेत.

नेमका निर्णय काय?

अभ्यासक्रमात २५ % भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ आणि त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे परीक्षेत या संदर्भात प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. पण भाषा विषयात वगळण्यात आलेल्या अभ्यासाला जोडून असलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.

तसेच वगळण्यात आलेला अभ्यासक्रम शाळेत शिकवला जाणार नाही पण विद्यार्थ्यांनी घरी त्याचा अभ्यास करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

यासंदर्भातील अधिक माहिती www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.

Similar News