वांद्रे पश्चिम मतदारसंघ : आशिष शेलार विजयी

Update: 2019-10-24 08:09 GMT

वांद्रे पश्चिम मतदारसंघातुन भाजपाचे आशिष शेलार विजयी झाले आहेत. कॉग्रेसच्या असिफ जकेरीया यांचा त्यांनी पराभव केला आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार 25 हजार 900 पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या अॅड. आशिष शेलार यांनी 74 हजार 779 एवढी मते घेत विजय मिळवला होता. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस चे बाबा सिद्दीकी होते. त्यांना 47 हजार 868 मते मिळाली. आणि त्यांचा 26 हजार 911 मतांनी पराभव झाला. आशिष शेलार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Similar News