'ट्रेड वॉरमुळं स्थलांतरीत कंपन्या भारतात येऊ शकतात'- मुख्यमंत्री

Update: 2019-09-23 10:10 GMT

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी कोर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घोषित केला. या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून भविष्यात याचा महाराष्ट्राला फायदाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी देशात उद्योग वाढ होण्याची शक्यता वर्तवली असुन यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "निर्मलाजींनी एकूणचं जागतिक परिस्थिती पाहता जी काही सुडाची परिस्थिती आहे. त्याचा परिणाम भारतावर होवू नये आणि या उलट जी काही ट्रेड वॉरची परिस्थिती आहे त्याचा फायदा भारताला मिळावा त्या करता ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्यांचा महाराष्ट्र प्रचंड मोठा लाभार्थी असेल. कॉर्पोरेट टॅक्स मध्ये 22% कपात केल्यामुळं फायदा होईल. आज अमेरिका आणि चिन मध्ये एक मोठा ट्रेड वॉर सुरू आहे. त्यामुळे अनेक कंपन्या स्थलांतरीत होत आहेत त्या भारतात येऊ शकतात." अशी शक्यता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

https://youtu.be/jaV_BH_HEPs

 

Similar News