राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवाराने अपंग,वीरमाताच्या उपस्थित केला अर्ज दाखल

Update: 2019-10-02 10:56 GMT

विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे निलेश लंके मैदानात उतरले असून त्यांनी पारनेर-नगर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज अपंग,वीरमाता यांच्या समवेत दाखल केला आहे.

यावेळी निलेश लंके यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका असून तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेती मालाला हमी भाव, आरोग्याचे प्रश्न हे मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहोत. तसंच या भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर आम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी सुपा येथे नोकरी मेळावा भरवला होता. या मेळाव्यात 12000 युवक, युवतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 5000 तरुणांच्या हाताला काम देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण केले. यापुढे देखील तरुणांच्या रोजगारासाठी काम करत राहील. असं आश्वासन निलेश लंके यांनी अर्ज दाखल केल्यानंतर केले आहे.

Full View

Similar News