3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार?

Update: 2020-05-31 12:43 GMT

भारत सरकार ने Unlock 1 ची घोषणा केल्यानंतर आता राज्यसरकारने देखील नियम शिथील करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील कंटेंन्मेंट झोन वगळता जनजीवन सुरु करण्यात येणार आहे.

राज्यातील धार्मिक स्थळ, हॉटेल, मॉल्स, रेस्टॉरंट बंदच राहणार आहे. राज्यातील सामूहिक कार्यक्रमांवर बंदी ठेवण्यात येणार आहे. तसंच कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे.

राज्यात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येणार

पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार

दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार

तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार

3 जूनपासून राज्य अनलॉक मोडवर...

कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात इतर भागात नियम शिथिल राहतील, कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

सरकारी कार्यालये सुरु होणार...

कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सरकारी कार्यालये सुरू होणार

राज्य सरकारने १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम अशा सगळ्यांना कंटेन्मेंट झोन वगळता परवानगी. फक्त वैयक्तिक व्यायामाला परवानगी, लोकांनी जवळच्या जवळच व्यायाम करण्याचे निर्देश

कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक मैदाने खुली होणार

लांबच्या प्रवासावर बंदी

शाळा, कॉलेज महाविद्यालये बंदच राहणार

मेट्रो बंदच राहणार

समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही परवानगी

धार्मिक स्थळ बंदच राहणार

स्डेडियम मात्र बंदच राहणार

प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी

गॅरेज तसंच वर्कशॉप यांना अपॉइंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी

सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंदच राहणार

Similar News