गडचिरोली पोलिसांचे नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर, गोळीबारात तीन नक्षली ठार

गडचिरोली पोलिसांचे नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर, गोळीबारात तीन नक्षली ठार

Update: 2023-05-01 08:40 GMT

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कामगिरी करत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

गेल्याच आठवड्यात छत्तीसगडमधील दंतेवाडी येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात 11 जवान शहीद झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील पोलिस सतर्क झाले होते. त्यातच गडचिरोली जिल्यातील पेरिमिली आणि अहेरी दलम हे मनेराजाराम ते पेरिमिली पोलिस मदत केंद्रादरम्यान कडमारा येथील परिसरात नक्षलवाद्यांनी तळ ठोकला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गडचिरोली पोलिसांनी सापळा रचून ऑपरेशन राबवले. मात्र यावेळी नक्षवाद्यांना संशय येताच त्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला.

गडचिरोलीतील पेरमिली ताडगाव जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक आता अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याने पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Tags:    

Similar News