कोरेगाव- भिमा प्रकरणी पवारांची साक्ष?

Update: 2020-02-20 12:18 GMT

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या शरद पवार यांनाच आता साक्ष देण्यासाठी बोलावण्यात यावे अशी मागणी अॅरड. प्रदीप गावडे यांनी केली आहे. त्यांनी चौकशी आयोगाकडं त्यासाठी अर्ज केला आहे. एल्गार परिषद प्रकरणाबाबत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केलीहोती. पण त्यानंतर लगेचच केंद्र सरकारनं या प्रकऱणाचा तपास एनआयएकडे सोपवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राच्या निर्णयाला कोर्टात विरोध न केल्यानं शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर शरद पवारांनी वारंवार कोरेगाव-भिमा दंगलीमागे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे याचा हात असल्याचा आरोप केला आहे. कोरेगाव भिमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणताही वाद नव्हता. पण आजुबाजूच्या गावांमध्ये.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केलं, असा आरोप शरद पवरांनी केला होता. त्यावर शरद पवारांना या ही माहिती कुठून मिळाली, त्यांच्याकडे आणखी कोणती माहिती आहे का यासाठी त्यांची लगेचच साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अॅड. प्रदीप गावडे यांनी केली आहे.

Similar News