धक्कादायक: तासगावातून एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण

Update: 2022-07-24 12:29 GMT

सांगली जिल्ह्यातील तासगामधे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून नर्स असल्याचे भासवून महिलेने एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरणा चे कृत्य उघडकीस आले असून शहरात खळबळ माजली आहे.

नर्स असल्याचे भासवून एका महिलेने तासगाव मधील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यातून एक दिवसाच्या चिमुरड्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी सबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी की येथील सिध्देश्वर चौकातील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यात एक महिला प्रसूत झाली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून सबंधितांच्या वार्डमध्ये गेली. तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले.

या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. ही महिला दोन दिवसांपूर्वीच दवाखान्यात जॉईन झाली होती. 

Tags:    

Similar News